आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जगात, लोक आरोग्यासाठी सुद्धा तितकेच वेगवान परंतु नैसर्गिक उपाय शोधत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आणि उपचारांनी उल्लेखनीय प्रगती केलेली असली तरी, सध्याच्या काळात अनेकांचा कल हा आपल्या प्राचीन उपचारांकडे वळत आहे. भारताच्या मातीत मुरलेल अस आपल आयुर्वेदशास्त्र खरच भारताच्या वैद्यकीय प्रणालीचा पाया आहे. आज कुठेतरी पुन्हा आपल्याला याची जाणीव होऊ लागली आहे की, मन, शरीर आणि आत्मा या सर्वांनाच जर सुदृढ ठेवायच असेल तर आयुर्वेदाशिवाय दुसरा पर्याय नाही.
आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर 'आयु' म्हणजे जीवन आणि 'वेद' म्हणजेच ज्ञान अशी होते.. आता तुम्हीच बघा, शब्दातच किती सामर्थ्य आहे ते!!! केवळ लक्षणांवर उपचार करण्याऐवजी, आयुर्वेदाचा उद्देश आजाराचे मूळ कारण ओळखणे आणि शरीराचे संतुलन कायम ठेवणे हा आहे. आयुर्वेदात प्रामुख्याने हर्बल उपचार, मसाज, योग, ध्यान आणि आहार या सर्व गोष्टींचा समतोल राखला जातो.
आयुर्वेदाची अशी माहिती असून देखील आपण अनेकदा रासायनिक गोष्टींनी अगदी तुडुंब भरलेल्या उपचारांकडे जातोच.
रासायनिक उपचारांचा काही वेळा प्रभाव लगेच दिसत असला तरी दिर्घकाळात मात्र ते त्रासदायकच ठरतात. रासायनिक गोष्टींचा शरीरावर आणि हळू हळू मनावर साइड इफेक्ट हा होतोच. तसेच हे उपचार आजाराला किंवा समस्येला मुळापासून बरे करतही नाहीत आणि म्हणुनच समस्येला मुळापासून काढून टाकण्यासाठी आयुर्वेद हे एकच अस अस्त्र आहे जे आजार झाल्यावर तो बरा ही करते आणि आजार होऊ नये म्हणून देखील मार्गदर्शन करते.
अनेकांना असणार्या अश्याच अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजेच आपल्या केसांची समस्या..!!! वाढत चाललेले प्रदूषण, अस्वच्छ पाणी, बिघडलेले वातावरण, तसेच सतत असलेले अनेक प्रकारचे टेंशन अश्या सर्व गोष्टींमुळे सर्वांनाच या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
चला तर मग पाहूया. आयुर्वेदाच्या साथीने या समस्येला मुळासकट कसे काढून टाकता येईल ते!
आयुर्वेदातील केसांची काळजी घेण्याच्या पद्धती:
- स्कॅल्प मसाज: आयुर्वेदिक तेलांनी नियमित स्कॅल्प मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होते, केसांचे पोषण होते आणि केसांच्या वाढीस चालना मिळते. नारळ तसेच केसांसाठी उत्तम असे असलेले बदाम तेल आपल्या टाळूवर हळूवारपणे मालिश केल्यास फरक लगेच दिसून येतो.
- हर्बल हेअर मास्क: आयुर्वेद विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याला देत जे केसांच्या विशिष्ट समस्यांचे निराकरण करू शकतात. जस की, केसांच्या वाढीसाठी आवळा, पोषणासाठी ब्राह्मी, कोंडा नियंत्रणासाठी कडुलिंब आणि केस मजबूत करण्यासाठी जास्वंद यांचा समावेश होतो.
- योग्य आहार आणि जीवनशैली: निरोगी केसांच्या वाढीसाठी ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रथिने समृद्ध संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे इत्यादी गोष्टी आपल्या केसांची निगा राखण्यास मदत करू शकतात.
- रसायने टाळणे: सध्याच्या आधुनिक उत्पादनांमध्ये सल्फेट्स, पॅराबेन्स आणि सिंथेटिक सुगंध यांसारखी कठोर रसायने टाकली जातात. त्यामुळे नैसर्गिक शाम्पू, कंडिशनर आणि केसांची काळजी घेणारी उत्पादने निवडा जी या हानिकारक घटकांपासून मुक्त आहेत.
नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने केवळ तुमच्या केसांचे आरोग्यच वाढणार नाही तर तुमच्या सर्वांगीण विकासातही हातभार लागेल. तर, तुम्ही तुमच्या केसांना नैसर्गिक सौंदर्य देण्यासाठी तयार आहात का???
जर हो! तर तुमच्या या प्रवासात तुमची मदत करायला आले आहे 'आयुत्मा'. आयुर्वेद आणि आत्मा या शब्दांवरून आयुत्मा शब्दाची निर्मिती झाली.. आणि नावाप्रमाणेच काम सुद्धा हे उत्पादन करते. आयुत्मा तुम्हाला तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक आणि
आयुर्वेदिक पोषण प्रदान करते आणि तुमचे केस अधिक सुदृढ आणि चमकदार बनवते. तुमच्या केसांच्या समस्यांसाठी आयुत्मा हे अगदी रामबाण उपाय आहे. कारण आयुर्वेदात वर सांगितल्या प्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्या केसांसाठी पूरक असतात त्या त्या सर्व गोष्टी आयुत्मा तुम्हाला देते. तेही योग्य प्रमाणात आणि योग्य दरात.
नारळाचे तेल, हीना, ब्राम्ही, मेथी, जास्वंद, बदाम, आवळा, शिकेकाई, रिठा आणि अश्याच अनेक आयुर्वेदिक वनस्पतींची सांगड 'आयुत्मा' मध्ये घातली गेलेली आहे. तेव्हा तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी नक्की वापरा 'आयुत्मा'. (www.ayutma.com)
By Rupal Sawant